कधीतरी आपण खूप वैतागतो
आणि घर आवरायला घेतो.
मोठा मोठा कचरा पहिले बाजूला होतो,
जळमटं झडून पडतात,
पंखे, लाईट्स साफ होतात,
ट्यूबलाईट्सचा नेहमीसारखाच प्रकाश आपल्याला उगाचच लख्ख वाटू लागतो...
गेल्या वर्षी फ्रेम करण्यासाठी बाजूला काढून ठेवलेले फोटो
त्यावेळी रिकाम्या केलेल्या आणि आत्ता ऊतू जाणाऱ्या ड्रॉवरच्या तळाशी सापडतात,
थोडे उसवलेले कपडे संध्याकाळी बाहेर पडू तेव्हा शिवायला टाकायचे
म्हणून एका निळ्या पिशवीत भरले जातात,
अंगठा तुटलेली आपली आवडती चप्पल मोच्याकडे द्यायची
म्हणून मनाशी पक्कं ठरवलं जातं...
गाद्या झटकल्या जातात, चादरी नवीन येतात!
आणि मग एक फक्कड असा चहा घेऊन
मागच्या वेळी घर आवरताना तयार झालेल्या पिशव्या,गाठोडी उलगडली जातात..
"केवढ्या गोष्टी साठल्या आहेत,
काही कामाच्या नसलेल्या गोष्टी आता टाकूनच द्यायच्या,
सगळा कचरा कमी करायचा",
असं ठामपणे मनाशी ठरवून आपण त्या पसाऱ्यात हात घालतो,
आणि...
️

Totally relatable😂
उत्तर द्याहटवा